धनगरांनी आरक्षणाचा जल्लोष कधी करायचा?

Foto

औरंगाबाद - धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न पहिल्या कॅबिनेट मध्ये सोडवू असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. आज ४ वर्षे उलटूनही धनगर आरक्षणाचा प्रश्न या सरकारने मार्गी लावलेला नाही. त्यामुळे धनगर समाजालाही आरक्षणाच्या जल्लोषाची तारीख सांगा असा सवाल यशवंत सेनेचे नेते भारच सोन्नर यांनी सांजवार्ता ऑंनलाईनशी बोलतांना उपस्थित केला.

 

मुख्यमंत्र्यांनी नुकतीच मराठ्यांनो १ डिसेंबरला जल्लोष करा अशी घोषणा केली होती. त्यामुळे  येणाऱ्या अधिवेशनात आरक्षणाचा प्रश्न तत्काळ मार्गी लावून धनगर समाजालाही जल्लोषाची तारीख सांगावी. अन्यथा यशवंत सेना धनगर समाजाच्यावतीने तीव्र आंदोलने करण्यात येतील, असा इशारा यशवंत सेना धनगर समाज नेते भारत सोन्नर यांनी दिला आहे.